ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन

0

औरंगाबाद  :  मिसारवाडी येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती
आज  साजरी करण्यात आली.  शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.

मिसारवाडी येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती
आज (ता. 12)  मंगळवार राेजी साजरी करण्यात आली.  शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र सर्व विद्यार्थ्यांना भाषणाद्वारे समजून सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी ‘युवा दिन ‘ का साजरा केला जातो. याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय आघाव यांनी केले तर किरण कुमार सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली बोरुडे, अजयकुमार खिल्लारे , आनंद सातदिवे, स्वामी जाधव, नयन शेख , गौतम मकासरे सह आदींनी परिश्रम घेतले .

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.