अनिल देशमुखांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटलांना सुनावले

अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली

0

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचे निरीक्षण नोंदवत पाटील यांना फटकारले आहे.

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया देत अशा याचिका स्वस्तातील लोकप्रियतेसाठी केल्या जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनीषा पिटाले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

न्यायालयाने जयश्री पाटील यांना या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावेळी वकील जनरल आशुतोष कुंभकोनी यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आधीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केलेली आहे. त्यावर बुधवारी (31 मार्च) सुनावणी होणार आहे. यावेळी त्यांनी पाटील यांची याचिका चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचेही म्हटले. दरम्यान, याआधी पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावरील महिन्याला 100 कोटी वसुलीच्या आरोपांनंतर मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावी,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली.
तक्रारीमध्ये शरद पवारांचे नाव

“मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. तसेच, यामध्ये मास्टरमाईंड महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केला.

पॉवरपुल असले तरी गुन्ह्यातून सुटका करता येत नाही

. यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. तसेच, अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदर्भातील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले.

आरोपी राष्ट्रवादीचे पुढारी म्हणून कारवाई नाही

जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे स्वत:च गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे पाटील यांनी म्हटले. “जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून तात्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंह यांनी तशी हिंमत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,” असा आरोप पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केला. दरम्यान, पाटील यांनी तक्रार दाखल केली असली तरी, देशमुख यांच्याविरोधत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पाटील यांच्या तक्रारीनंतर  आता मुंबई पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत जयश्री पाटील?

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली
जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत .
जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्षे काम पाहिले. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तके लिहिली आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.