पोलिसात तक्रार दिल्याचा राग, नातवाने आजोबांचा करून खून फेकले नाल्यात

रघुनाथ श्रावण बेंडकुळे यांचा खून नातवाने केल्याचे उघडकीस, आरोपीस अटक

0

नाशिक : नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला. आजोबांनी आपल्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा रागात नातवाने आजोबांचाच खून केला. रघुनाथ श्रावण बेंडकुळे यांचा खून नातवाने केल्याचे उघड झाले.  संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे यास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग अनावर झाल्याने किरणने रविवारी (ता.११) रात्री घराबाहेर झोपलेल्या आजोबांच्या डोळे, नाक, तोंड, हाताला चिकपट्टी लावली व लोखंडी साखळीला बांधून मृतदेह मारुती ओमनीने धोंडेगाव येथून ओढा शिवारात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ‘वैष्णवी’ ढाब्याच्या समोरील नाल्यात टाकला. दुसर्‍या दिवशी ओढा नाल्यात एका वृद्धाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिस पाटील गजानन भोर यांनी आडगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणत ओळख पटवली. मृतदेह रघुनाथ श्रावण बेंडकोळी असल्याचे समजले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नातवाने घराबाहेर जाण्यास  विरोध केला होता. तसेच शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याची पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रार केली म्हणून नातवाने आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी तसेच हातपाय बांधून नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आडगाव पोलिस तपासात पोलिसांनी  मारुती कार ताब्यात घेतली. नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी एक महिन्यापूर्वी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.