..आणि गौरवने बिबट्याच्या कानशिलात लगावून वाचवला प्राण

गौरव हा मक्याच्या शेतात गेला असता, दडून बसलेल्या बिबट्याने घेतली त्याच्या अंगावर झेप

0

सिन्नर : नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने  12 वर्षांंच्या गौरव काळुंगे  याच्यावर हल्ला केला होता. पण, मोठ्या हिंमतीने बिबट्याच्या कानशिलात लगावून त्याने  आपला जीव वाचवला.

मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यात सोनारी गावात  ही घटना घडली. या घटनेत गौरव काळुंगेच्या हाताला पााच टाके पडले. त्याच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. गौरव हा मक्याच्या शेतात गेला होता. त्यावेळी तिथेच दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर झेप घेतली. बिबट्याने जशी झेप घेतली तशीी गौरवने आपला एक हात पुढे करून वाचण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उजवा हातच बिबट्याने आपल्या जबड्यात पकडला. आता बिबट्याने आपला हात तोंडात पकडलेला पाहून गौरव क्षणभर घाबरला, पण दुसऱ्याच क्षणी त्याने हिंमत दाखवून डाव्या हाताने बिबट्याच्या कानशिलात लगावली. पूर्ण ताकदीने त्याने बिबट्याच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे बिबट्याने त्याचा हात सोडला आणि त्यानंतर भांबवलेल्या अवस्थेत बिबट्याने शेतातून धूम ठोकली. अंगावर शहारे आणणारा हा अनुभव गौरवने जेव्हा गावातील लोकांना सांगितला, तेव्हा सर्वांनी काळजी तर व्यक्त केली, पण त्याच्या धाडसाचे कौतुकही केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.