आयशर टेम्पोने चिरडले पायी जाणाऱ्या वृद्धास, त्यांचा जागीच मृत्यू
कोळवाडी बसस्टँड समोर भरधाव आयशर टेम्पोची धडक
बीड : कोळवाडी बस स्टँड समोर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चालत असलेल्या ७० वर्षीय वृद्धास आयशर टेम्पोने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना बीड मांजरसुंबा रस्त्यावर घडली.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोळवाडी बस स्टँड समोर रस्त्याने पायी चालत असलेल्या ७० वर्षीय वृद्धास आयशर टेम्पोने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना बीड मांजरसुंबा रस्त्यावर घडली. कोळवाडी येथील शंकर जाधव (वय ७० वर्ष ) हे पायी जात असताना कोळवाडी बस स्टँड समोर भरधाव वेगात असलेल्या आयशर टेम्पो (क्रमांक एम एच १९ / झेड ५४९७) याने जोराची धडक दिल्याने शंकर जाधव यांचा जागीच ठार झाला आहे. ही घटना बीड मांजरसुंबा रोडवर असलेल्या कोळवाडी बस स्टँड समोर घडली आहे.