बनावट क्रीडा प्रमाणपत्रप्रकरणी क्रीडा उपसंचालकासह एका अधिकाऱ्यास अटक

माजी क्रीडा उपसंचालक, क्रीडा अधिकाऱ्यांचा पदाचा दुरुपयोग

0

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सेवानिवृत्त  क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला  नागपुरात मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे.  सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

नागपूरमध्ये मानकापूर पोलिसांनी क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला  अटक केली.  सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक करण्यात आली आहे. बोगस खेळांडूंवर कारवाईनंतर बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी  क्रीडा अधिका-यांवर ही कारवाई करण्यात आली. बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी लाटणाऱ्या दोघा खेळाडूंना अगोदरच अटक करण्यात आली होती. बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन क्रीडा उपसंचालक आणि क्रीडा अधिकारी यांनी  क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी न करता  पदाचा दुरुपयोग केल्याचे आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. नागपुरात अगोदरच  22 बोगस खेळाडूंचे बनावट क्रीडा प्नमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट असून अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. राज्यातील संपूर्ण क्रीडा विश्वात याप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.