पुण्यात ऊसतोड कामगार, वाहतुकदारांच्या मागण्यांबाबत आज महत्त्वाची बैठक
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी १ वाजता बैठक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन
पुणे : आज पुण्यात ऊसतोड कामगार आणि वाहतुकदारांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक होत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी १ वाजता बैठक होईल. यावेळी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी १ वाजता बैठक होईल. यावेळी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित असतील. दुसरीकडे आमदार सुरेश धस हेदेखील साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ऊसतोड मजुरांचा संप चिघळला आहे. सौताडा येथे बीड-अहमदनगर महामार्गावर काही तरुणांनी टायर जाळून ऊसतोडणी मजुरांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळासाठी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होतं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचा संप संपला असल्याचं जाहीर केलं होते.