अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रस्त्गालगत घडली घटना, 10 दिवसांत दुसरी घटना

0

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रस्त्गालगत  ही घटना घडली. 10 दिवसांत दुसऱ्यांदा, अशी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 10 दिवसात दोन जणांचे प्राण गेल्यामुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रस्त्गालगत  ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच् नाव सक्षम गणेश आठरे (वय 8) असे आहे. तो आजोबांसह घराच्या पडवीमध्ये झोपला होता. रात्री तीन वाजता बिबट्याने हल्ला केला. यानंतर नातेवाईक आणि वनविभागाच्या पथकाने शोध घेतल्यानंतर तुरीच्या पिकात मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील दुसरी घटना : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील काकडदरा येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 15 ऑक्टोबरला ही घटना घडली.  ती चिमुकली रात्री दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ती चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्या तिला उचलू घेऊन पुन्हा जंगलात निघून गेला. या प्रकाराने वस्तीवर गोंधळ उडाला. पावसामुळे बिबट्याने उचलून नेलेल्या चिमुकलीच्या शोधात अडथळे आले होते. या घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक काकडदरा येथे सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्यावेळी ती मृत अवस्थेत आढळून आली. दरम्यान, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.