‘देशाच्या विकासात अमित शाहांचे मोठे योगदान’, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज 56 व्या वर्षात पदार्पण

0

नवी दिल्ली : केद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आज त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांचे आज 56 व्या वर्षात पदार्पण होत आहे.

केद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आज त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज 56 व्या वर्षात पदार्पण  करत आहे. यानिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, “अमित शाह यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. देशाच्या प्रगतीमध्ये ते ज्या प्रकारे समर्पण आणि उत्कृष्टपणे योगदान देत आहेत. त्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. भाजप पक्षाला बळकट करण्यातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारताच्या सेवेसाठी ईश्वर त्यांना स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना.”

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.