सत्तारांनी फेटाळले आरोप, 21 वर्षांत माझ्या अनेक क्लिप बनवल्या

माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी अब्दुल सत्तार जबाबदार : भगवान जिवरक

0

औरंगाबाद  : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर एका कार्यकर्त्यानेच गंभीर आरोप केले. काल मी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांसंबंधी प्रश्न विचारला असता, अब्दुल सत्तार यांनी मला शिवीगाळ केल्याचा आरोप भगवान जिवरक यांनी केला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांनी मला शिवीगाळ केली असून, ठार मारण्याची धमकी दिल्याचेही जिवरक यांनी सांगितले. तसेच माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी अब्दुल सत्तार जबाबदार राहतील, असेही भगवान जिवरक म्हणाले. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांनीसुद्धा या सर्व प्रकरणावर खुलासा केला.

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो, रात्रीच्या दरम्यान मी लोकांशी बोलत असताना त्याने वारंवार अडचण आणली. मी जे काही बोललो, त्यात तथ्य नाही. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांसंदर्भात जर कोणी अपशब्द बोलत असेल तर ते ऐकून घेणार नाही. निवडणुकीला अजून चार वर्षे बाकी आहेत. त्यामुळे विरोधकांनी अशा मुलांना दारू पाजून दुसऱ्यांच्या सभेत गोंधळ करण्यासाठी पाठवू नका, जर असे विरोधक करणार असतील तर त्यांना मी शिवसेना स्टाईलने उत्तर देईन, माझ्या तोंडात अशा प्रकारे विधान घातले जात आहे, माझ्या एकवीस वर्षांच्या कालावधीत अनेकदा अशा क्लिप बनवण्यात आल्या आहेत, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनी पाहणी दौराही केला होता. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळावी, या उद्देशाने हा पाहणी दौरा करत असल्याची माहिती सत्तार यांनी दिली होती. यावेळी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणार का? या प्रश्चाचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले होते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाल्याने सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घेऊन आम्ही दौरा करत आहोत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हे आसमानी संकट आहे. या संकटात शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे लागले आहे. सरकारी अधिकारी येऊन आमची शेती बघतील, नुकसानीता पंचनामा करतील, अशी आशा शेतकऱ्याला लागलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांचा दौरा करू”, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.