सर्व उद्याने उघडली; पण पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान दुरवस्थमुळे टाळेबंद!

310 एकरवरील उद्यानात चरताहेत गुरे, खेळणी मोडकळीस

0

पैठण  :  महाराष्ट्रासह देशातील उद्याने बंद होती. आता सर्व उद्याने उघडली असली तरी पैठणचे प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान मात्र  दुरवस्थमुळे उघडलेच नाही. महाराष्ट्रात ख्याती असलेले हे उद्यान तसेही आता नावालाच राहिले आहे. ३१० एकरांवरील या उद्यानात सध्या गुरे चरतात. बकाल अवस्थेमुळे पर्यटकांनी आधीच पाठ फिरवली असतानाच कोरोनामुळे हे उद्यान सात महिन्यांपासून बंदच आहे. ते सुरू करण्यासंदर्भात महसूल विभागाने परवानगी दिलेली नाही. उद्यानातील कारंजांसह इतर खेळणीही बंदच आहे.

महाराष्ट्रात ख्याती असलेले हे उद्यान तसेही आता नावालाच राहिले आहे. ३१० एकरांवरील या उद्यानात सध्या गुरे चरतात. बकाल अवस्थेमुळे पर्यटकांनी आधीच पाठ फिरवली.  उद्यानाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहेच. शिवाय ३१० एकरांवरील हे उद्यान जनावरे चारण्याचे ठिकाण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ७० लाख रुपये खर्च करून भिंत बांधण्यात आली. मात्र बाकी ठिकाणी तारेचे कुंपण नसल्याने जनावरे दिवसभर उद्यानात चरतात. ७० लाखांच्या निधीतून उद्यानाला सर्व बाजूंनी तारेचे कुंपण करणे गरजेचे होते. मात्र समोरची एक भिंत उभारून जनावरांसाठी देखणे कुरण उभारण्याचे धोरणच प्रशासनाने राबवले आहे. उद्यानामधील एकमेव आकर्षण असलेले संगीत कारंजेही बंद पडले आहे. यासह इतर कारंजेही सुरू करण्याची गरज आहे. सध्या उद्यानातील कोणतेच कारंजे सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उद्यान जास्तीचे पर्यटक आले पाहिजे, यासाठी प्रशासन पुढाकार घेताना दिसत नाही. उद्यान फक्त मॉर्निंग वॉकपुरतेच मर्यादित राहिले आहे. आता कोरोनानंतर पर्यटकांची संख्या वाढू शकली असती. मात्र कोरोनानंतरही उद्यानाची दुरुस्ती झाली नसल्याने पर्यटकांची संख्या वाढणे अशक्य आहे. मात्र, उद्यानात जाऊन चरणाऱ्या जनावरांची संख्या नक्कीच वाढली आहे. राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये या उद्यानाचा समावेश होतो. मात्र पर्यटक आकर्षित होतील, असे धोरण मागील दहा वर्षांत पाटबंधारे  विभागाने घेतले नाही. उद्यानाच्या खासगीकरणानंतर तर पुणे येथील राजू सातव यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. मात्र शासनाचा कर न भरताच त्यांनी पळ काढला. आता शासनाच्या पाटबंधारे विभागाकडे उद्यानाचा ताबा असल्याने या विभागासमोर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच्या उपाययोजना आखाव्या लागतील. सन १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७०० व्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या वेळी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या उद्यानाची मुहूर्तमेढ महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते रोवली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.