जीमेल, यूट्यूबसह गूगलच्या सर्व सर्व्हिसेस क्रॅश
गूगलकडून अद्याप आले नाही स्पष्टीकरण
दिल्ली : जगभरातील गूगलच्या सर्व सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी 5.26 वाजता क्रॅश झाली. यूजरला जी-मेल, यूट्यूबसह गूगलच्या कोणत्याच सर्व्हिसचा वापर करता येत नाहीये. गूगलने अद्याप यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही.
ब्रिटेनमधील मिरर या वृत्तपत्राने सांगितले की, जगभरातील 54 टक्के लोकांना यूट्यूब अॅक्सेस करता येत नाही. तसेच, 42 टक्के लोकांना व्हिडिओ पाहता येत नाही. आणि 3 टक्के लोकांना लॉगइन करताना अडचण येत आहे. याशिवाय जीमेलवरही 75 टक्के लोक लॉगइन करु शकत नाहीयेत.
या सर्व्हिसेसवर परिणाम
गूगलचे हँगआउट, गूगल फॉर्म, गूगल क्लाउड, गूगल ड्राइव, गूगल डॉक्सदेखील क्रॅश झाले आहे.