कृषिमंत्री दादासाहेब भूसे यांनी नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी
पिके पिवळी पडून खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील गावांत सतत तीन महिन्यांपासून जोरदार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके पिवळी पडून सडत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भूसे यांनी हिंगोली दौऱ्यावर असता, दुपारी ४ वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील देमणी वाहेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
औरंगाबाद तालुक्यातील गावांत तीन महिन्यांपासून जोरदार पावसाने थैमान घातल्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके पिवळी पडून सडत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भूसे यांनी हिंगोली दौऱ्यावर असता, दुपारी ४ वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील देमणी वाहेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री पैठणचे आमदार संदीपान भुमरे, विभागीय कृषी अधीक्षक दिवेकर,अनिलकुमार हातगावकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, इतर अधिकारी उपस्थित होते. पीक पाहणी दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री भूसे यांनी देमणी वाहेगाव येथील शेतकरी सरदार शहा यांच्या शेतातील कपाशी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये असे यावेळी बोलतांनी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव शिंदे,अक्षय जायभाये,मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण काळे,कृषी परयवेक्षक बाळासाहेब निकम, कृषी साहय्यक कृष्णा गट्टेवार, उपतालुकाप्रमुख शंकरराव ठोबरे माजी सरपंच भगवान वाघ, पंचायत समिती उपसभापती चंद्रभान पडुळ, शेतकरी सुरेश अंतराये,प्रकाश शिंदे,माजी सरपंच शिवाजी तोगे,सुभाष सोनवणे, विकास शिंदे यांच्या शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.