उस्मानाबादेत अघोरी कृत्य, उघडकीस लिंबू, नारळ आणि घरातच मोठा खड्डा

अज्ञात मांत्रिकाचे घरातील व्यक्ती आजारी पडत असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य उघडकीस

0

उस्मानाबाद :  तालुक्यातील नाईचाकूर येथील एका कुटुंबाच्या घरातील व्यक्ती आजारी राहात असल्यामुळे अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य  करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खड्डा करून त्यात पूजेचे साहित्य ठेवल्याने  खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह एका जणावर गुन्हा दाखल केला आहे.

नाईचाकूर येथे हैदर महेबूब मुल्ला यांच्या नावे भूकंपीतील पून्वर्सित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कोणीही राहात नव्हते. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पूजा करणार असल्याची माहिती आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलिस पाटील बाळू स्वामी यांना दिली. बाळू स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठ्ल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता, एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबू असे पूजेचे साहित्य आढळले होते. तसेच बाजूस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसला व बाजूच्या खोलीमध्ये 3 कलताणी पोते, दोन लिंबू व नारळ असे साहित्य अघोरी  कृत्य  व जादुटोणा करून पडलेले दिसले. या बाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपूस केली असता, तिने असे सांगितले की, ‘माझी उमरगा येथील बहीण नामे नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला एका अज्ञात मांत्रिकाने तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदून त्यात नारळ, लिंबू पूजा करून टाका’ असे सांगितले. त्यानुसार मी स्वतः, माझी बहीण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज शौकत पटेल हे रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये लिंबू नारळ व पूजा करणार होतो’, असेही तिने सांगितले. दरम्यान, हा प्रकार अंधश्रद्धेतून केल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलिस पाटील स्वामी यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, बीट अंमलदार दत्ता शिंदे व अन्य कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेहसिन मुल्ला, अरबाज पटेल यांनी नसरिन पटेल ही आजारी पडत असल्याने कोणत्या तरी मांत्रिकाच्या सांगण्यानुसार, अंधश्रद्धेचे अघोरी प्रकारे कृत्य करणार होते किंवा नाही की, आणखी कोणता दुसरा प्रकार आहे, हे तपासातून कळणार असून या प्रकरणी पोलिस पाटील बाळू स्वामी यांनी दिलेल्या तक्नुरारीसार उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.