पुन्हा नितीश कुमार की तेजस्वी यादव; बिहारी जनतेचा कौल थोड्याच वेळात

बिहार विधानसभा : मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. मतदानोत्तर कल थोड्याच वेळात

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा आज (शनिवारी)  संपला.  मतदानोत्तर चाचणीत  बिहारमधील मतदारांचा कल स्पष्ट होईल. थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकाल समोर येतील.  बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांसाठी मतदार पार पडले. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नितीश कुमारकी तेजस्वी यादवयाचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला.

प्रत्यक्षात तेजस्वी यादव की नितीश कुमार याचा निकाल 10 तारखेला लागणार असला तरी एक्झिट पोल्सचा अंदाज आजच स्पष्ट झाला आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांंत मतदान झाले. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातील लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळेचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि सीपीआय (एमएल) ने 19 जागा लढवल्या. एनडीए कडून नितीश कुमारांच्या जेडी (यू) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते. केंद्रात भाजप बरोबर एनडीएचा भाग असले तरी पासवानांनी बिहारमध्ये नितीश विरोध कायम ठेवला होता. या निवडणुकीत तो आणखी तीव्र केला. एकीकडे काँग्रेस- RJD यांच्या विरोधात आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्याही विरोधात पासवान असल्याने त्यांच्या पक्षाला मिळणारी मते कोणाला मोठे नुकसतान करतात, यावर बिहारचं भवितव्य ठरू शकते.

निवडणुकीच्या अगदी थोडे दिवस आधी पक्ष संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झाले. बिहारचे किंग मेकर ठरण्याची त्यांची इच्छा होती. पण मतदानोत्तर कल चाचणीत लोकजनशक्ती पक्षाला दिलेला कौल फारसा मोठा दिसत नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.