निकालानंतर झेंड्याच्या वादावरून भाजप – आरजेडी कार्यकर्त्यांची जुंपली

त्यांच्यावर सीवानच्या रुग्णालयात उपचार सुरू. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल

0

 बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झालेत. हे निकाल हाती आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्ष  आणि राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांत हाणामारी झाल्याची माहिती मिळली आहे.

निकाल हाती आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्ष  आणि राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांत हाणामारी झाल्याची माहिती मिळली आहे. या हाणामारीत जवळपास सहा – सात  जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. सिवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेशकांत सिंह यांनी विजय मिळवला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि आरजेडी कार्यकर्त्यांची काही कारणावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबांनी आपल्या घरांवर आरजेडीचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजप समर्थक नाराज होते. निकाल हाती येताच भाजपच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. या हाणामारीत राजदचे कार्यकर्ते गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांच्यावर सीवानच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींच्या म्हणण्यानुसार, घरावर आरजेडीचा झेंडा लावण्यावरून गावात भाजप समर्थक नित्यानंद सिंह यांच्यासह १४ जणांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.