…अखेर नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात, पाथर्डीकरांचा जीव भांड्यात

या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

0

अहमदनगर : पाथर्डीत तीन आठवड्यांपासून  नरभक्षक बनून नागरिकांची झोप उडवणारा बिबट्या आज पहाटे सावरगाव मायंबा परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. वनविभागाच्या तिसगाव,आष्टी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या पथकाला संयुक्त मोहीम राबवल्याने यश आले.

पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे 8 वर्षीय बालकाला, तर मढी येथील 3 वर्षीय चिमुरडीला बिबट्याने पळून नेऊन ठार केले होते. तसेच मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथे एका चार वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती. यामध्ये तिघांचाही बळी गेला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पाथर्डीत तीन आठवड्यांपासून  नरभक्षक बनून नागरिकांची झोप उडवणारा बिबट्या आज पहाटे सावरगाव मायंबा परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. वनविभागाच्या तिसगाव,आष्टी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या पथकाला संयुक्त मोहीम राबवल्याने यश आले. नगर विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड व नगर विभागांकडून सुमारे 25 पिंजरे गर्भगिरी डोंगररांगांमध्ये लावण्यात आले. नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना आदी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून अधिकारी-कर्मचारी बिबट्या शोधमोहिमेत गेले आठ दिवस अहोरात्र काम करत होते. शार्प शुटर, बेशुद्ध करण्यासाठीची औषधे, सर्चलाईट, नाईट कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, शूटगन, फटाके, ठसेतज्ञ अशी पथके तालुक्यात कार्यरत होती. मढी केळवंडी व शिरापूर येथील तीन बालके बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष “ऑपरेशन पाथर्डी” कडे लागून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा प्रस्ताव वनविभागाकडून नागपूर कार्यालयाला सादर झाला. अन्य ठिकाणाहून बिबटे गर्भगिरी डोंगर रांगांमधील जंगलामध्ये वनविभागाकडून आणून सोडले जात असल्याचा मुद्दा गेले 15 दिवस तालुक्यात लक्षवेधी ठरला. पकडलेला बिबट्या नरभक्षक आहे का, याची तपासणी नगरला होऊन नंतर त्याला सोडले जाईल, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.