यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणतात, “मुलीवर बलात्कार झालाच नाही”
यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांचा दावा
हाथरस : यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार म्हणतात, हाथरसच्या 19 वर्षीय मुलीवर बलात्कार झालाच नाही. “फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नाही, असे स्पष्ट म्हटले. तिच्या गळ्याला लागलेला मार आणि धसक्याने तिचा मृत्यू झाला”, असा दावा त्यांनी केला.
यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार म्हणतात, हाथरसच्या 19 वर्षीय मुलीवर बलात्कार झालाच नाही. “फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातूनही स्पष्ट झाले आहे की, तिच्यावर बलात्कार झाला नाही. घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातदेखील आपल्यावर बलात्कार झाल्याचे तरूणीने म्हटले नाही. फक्त मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता”. “हाथरसच्या मुलीचा मेडिकल अहवाल येण्यापूर्वीच सरकारविरोधात वक्तव्य करण्यात आली तसेच पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली. आम्ही याचा शोध घेऊ की, नेमके हे कोणी केले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. उत्तर प्रदेश सरकारने आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे”, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले. “आकडेवारीनुसार 2018 आणि 2019 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये शिक्षा देण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश पोलिस अव्वल आहे”, असं सांगायला देखील अतिरिक्त पोलिस महासंचालक विसरले नाहीत.