अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जातमुचलक्यावर जामीन मंजूर
रियाला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाला. रियाला १ लाख रुपयांच्या रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाला. रियाला १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.रियाला भारताबाहेर परवानगीशिवाय प्रवास करण्यास मनाई आहे. मुंबईच्या बाहेर जाताना तपासी यंत्रणेला सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच या प्रकरणातील अब्दुल परिहार आणि शौविक या दोघांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. रियाला १ लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.