अभिनेता विजय राज, कौवा बिर्याणी फेमला गोंदियात अटक

मीटू मोहिमेअंतर्ग बॉलिवूडमधील समोर आली अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे

0

गोंदिया : ‘मीटू’ माहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर येत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूडमधील विनोदी  आणि कौवा बिर्याणी फेम अभिनेता विजय राज याला काल रात्री पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखील अटक केली. विजय राज  या डॉयलॉगमुळे तो चाांगलाच परिचित आहे. विजय राज याने त्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे येथे गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. गोंदियातील हॉटेल गेटवे येथे विजय राज यांनी पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विजय राजवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.