विद्यार्थ्यांशी जातीभेद करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई!

विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार केल्यास त्या शिक्षकांवर कारवाईचा यूजीसीचा निर्णय

0

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने एससी, एसटी आणि इतर कोणत्याही जातीच्या आधारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार केल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने एससी, एसटी आणि इतर कोणत्याही जातीच्या आधारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार केल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यूजीसीकडे रॅगिंगच्या तक्रारी येत होत्या. तसेच काही काळापासून मेडिकल, इंजिनिअरींग व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर शिक्षकांकडून त्रास दिल्याच्याही तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत यूजीसीने अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.