भावाला मारहाण करताना पाहिले अन् आरोपीने केली आत्महत्या

भांगसी मातागड येथील बलात्कार प्रकरण

0

औरंगाबाद : भांगसी माता गडावर मित्रासोबत फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला व मित्राला भांगसीमाता गड परिसरात दोन जणांनी मारहाण करून त्यामधील एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला रावसाहेब माळी हा त्याच्या घराजवळील खवड्या डोंगरावर जाऊन बसला घरी आलेल्या पोलिसांनी विचारपूस करीत भावाला मारहाण करताना डोंगरावरून पाहिले आणि पोलिसांच्या दंडुक्याला घाबरून त्याने डोंगरावरून उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्याचा भाऊ रमेशने दिली.
मित्रासोबत फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला व मित्राला भांगसीमाता गड परिसरात दोन जणांनी मारहाण करून त्यामधील एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी राजू माळी नावाच्या संशयितास ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान, त्याने रावसाहेब सोबत गुन्ह्यात सामील असल्याची कबुली दिली होती. तेंव्हापासून गुन्हे शाखेचे पथक आणि दौलताबाद पोलिस रावसाहेबच्या शोधात होते. काल संध्याकाळी रावसाहेबने भाऊ रमेश समोर तिसगाव जवळील खवड्या डोंगरावरून उडी घेत आत्महत्या केली आणि तो बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली.
अनेकांचे आयुष्य अंधारमय, त्यात आमचा काय दोष
20 वर्षीय तरुणीवर बलात्कारचा मुख्य आरोपी रावसाहेब याने स्वतःचा जीव तर गमवला मात्र त्याच्या या वासनांध कृत्यामुळे पीडित तरुणीचे जीवन अंधारमय झाले आहे. त्याला पत्नी, एक 8 वर्षीय मुलगा व 7 वर्षीय मुलगी आहे. या सर्वांचा काय दोष. या निरागस चिमुकल्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. त्यांना ठाऊकही नसेल त्यांच्या वडिलांवर बलात्कारसारखा गंभीर गुन्हा असेल .एक व्यक्तीच्या वासनांध विचाराने अनेक आयुष्य मात्र आजघडीला अंधकारमय झाले आहे.
आरोपी रावसाहेबचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याचा भाऊ रमेशला एका ढाब्याजवळ बोलावून घेतले व त्या ठिकाणी रावसाहेब बाबत विचारणा करून मारहाण केली.त्या नंतर तीस गाव येथे देखील मारहाण केली.ही घटना अगोदरपासून डोंगरावर दडून बसलेल्या रावसाहेबने पहिली आणि मारहानीची प्रचंड भीती त्याच्या मनात बसली होती. भाऊ डोंगरावर लपून बसला असल्याची माहिती रमेशला मिळाल्यावर रमेश डोंगरावर गेला तेथे त्याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस खूप मारतात मला त्यांची भीती वाटते, मी पोलिसांना शरण जाणार नाही, माझ्या मुलांना सांभाळून घे असे त्याने खवड्या डोंगरावरून उडी घेत आत्महत्या केली अशी माहिती रावसाहेबचा भाऊ रमेश माळीने दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.