अन्वय नाईकांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल, अर्णब माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार

मागच्या सरकारने केस दाबून टाकल्याचा केला आरोप, या केससंबंधी मी फिरले दारोदारी

0

मुंबई   : आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. दरम्यान, आता अन्वय नाईक यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीला आपला पती आणि सासूच्या आत्महत्येला जबाबदार धरले आहे. तसेच मागच्या सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचाही त्या म्हणाल्या आहेत.

अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यामध्ये एक सुसाईट नोट आढळून आली होती. या नोटमध्ये अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकवले आहे. यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ अर्णब गोस्वामीला अटक होण्यापूर्वीचा असल्याचे दिसते. यामध्ये त्या म्हणत आहेत की, ‘सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली हे वाईट आहे. अर्णब गोस्वामी यासाठी खूप ओरडतो. माझ्या सासुबाईच्या आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहे. मागच्या सरकारने ही केस दाबून टाकली. या केससंबंधी मी दारोदारी फिरले. अजुनही मला न्याय मिळालेला नाही. मला न्याय कधी मिळणार. अर्णब गोस्वामी हा माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक ही झालीच पाहिजे. सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी विनंती करते की, त्यांनी नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. जे लोक सुशांत सिंह राजपूतसाठी ओरडत आहे, त्यांनी नाईक कुटुंबियांसाठीही ओरडावे, अशी मी विनंती करते.’ असे अन्वय नाईकांच्या विधवा पत्नी यामध्ये म्हणत आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.