अज्ञात वाहनाने चौघाला चिरडले…. उपचार दरम्यान २१ वर्षीय युवकाचा मृत्यू…..

0

अज्ञात वाहनाने चौघाला चिरडले…. उपचार दरम्यान २१ वर्षीय युवकाचा मृत्यू……

पहाटेच्या वेळी मैदानावर कसरत करण्यासाठी जाणाऱ्या चार पादचारी युवकांना एका अज्ञात सुसाट चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरची धडक दिली. ही घटना बुधवारी (दि़२५) जुलै रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वाळूज औद्यागिक क्षेत्रात जाणाऱ्या पंढरपूर तिरंगा चौक ते महावीर चौक दरम्यान असलेल्या पुलाजवळ घडली होती. दरम्यान या अपघात जखमी झालेल्या ४ जणांपैकी उपचार सुरु असताना गुरुवारी एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमचे वाळूज प्रतिनिधी सुदाम गायकवाड यांनी दिलेले सविस्तर वृत्त असे कि, वैभव काळे, शाम पंडीत, राहुल पाटील आणि विनोद शिंदे हे चारही तरुण बजाजनगरातील एका नामवंत अ‍ॅकडमीमध्ये पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण घेतात. हे सर्वजण हॉस्टेलवर राहत असून, बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान सिडको वाळूज महानगर येथील मैदानावर कसरत आणि प्रशिक्षण घेण्यासाठी जात होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यावरील महाविर चौक ते पंढरपूर तिरंगा चौक दरम्यान असलेल्या एका पुलाजवळ पाठीमागून सुसाट आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने वैभव काळे, शाम पंडीत, राहुल पाटील आणि विनोद शिंदे या चारही तरुणांना जोराची धडक दिली. या अपघातात तिघेजण जखमी तर राहुल पाटील (२१) याच्या डोक्याला आतील बाजूने गंभीर जखम झाली होती. या सर्व जखमीवर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असताना गुरूवारी राहुल पाटील याचा मूत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असुन, पुढील तपास फौजदार माणिकराव चौधरी हे करीत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.