बीडमध्ये अपघात; भरधाव ट्रकने शेतकऱ्यासह चिरडले दोन म्हशींना

सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंब्याजवळ भीषण अपघात

0

बीड : कोरोना आणि ऐन सणासुदीनंतरही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. अशा परिस्थितीत काळाने घाला घातला आणि शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरी जात असताना एका भरधाव ट्रकने शेतकऱ्यासह दोन म्हशींना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात शेतकरी आणि दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ट्रकने शेतकऱ्यांसह दोन म्हशींना जोराची धकड दिली. या अपघातात शेतकऱ्यासह 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातानंतर ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले होते. भानुदास वाघिरे अस अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरचे संकट काही कमी होत नाही. एकीकडे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आल्यानं कवडीमोल दर मिळत असल्याने सर्व भाजीपाल फेकून देण्याची किंवा गुरांना खायला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचदरम्यान असा अपघात झाल्याने वाघिरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.