‘एबीव्हीपी’ने गमावला महाराष्ट्राचा चेहरा, महामंत्री अनिकेत ओव्हाळांचा धबधब्यात बुडून मृत्यू

बिलगाव येथील धबधब्यात बुडुन मृत्यू, दुपारी दोनच्या सुमारास घडली घटना

0

 नंदूरबार :आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्यामध्ये बुडुन मृत्यू झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ  संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी  धडगाव तालुक्यात आले होते. त्यानंतर अनिकेत आपल्या सहा मित्रांसमवेत आज सकाळी बिलगाव धबधबा पाहण्यासाठी गेले. दुपारी दोनच्या सुमारास अंघोळीसाठी पाण्यात गेल्यानंतर परतत असताना त्यांचा पाय घसरला. पाय घसरल्यानंतर ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र विराज ठाकरे यांनी धाव घेतली. मात्र तेदेखील पाण्यात बुडत असल्याने त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घटनेत ‘एव्हीबीपी’चे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर अशोक लटपटे या त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीवरून त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह सध्या धडगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.