एरंडोल येथे ट्रकची शिक्षिकेच्या दुचाकीला धडक, या अपघातात शिक्षिका आणि मुलगा जागीच ठार

दुचाकीला दिलेल्या धडकेत शिक्षिका आणि तिच्या मुलाचा मृत्यू , या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त

0

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील शिक्षिकेचा आणि तिच्या मुलाचा दुचाकीवरून जाताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) आणि मुलगा लावण्य चौधरी (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. कविता या बर्डी (जळू) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होत्या. शाळेत जाताना त्या नेहमी मुलाला सोबत घेऊन जातात. आज गुरुवारी त्या सकाळी मुलाला घेऊन दुचाकीवरुन शाळेत जात असताना, एरंडोलजवळच त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात शिक्षिका व त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील विद्यानगर येथे राहणारे तथा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असलेल्‍या कविता कृष्णकांत चौधरी या मुलगा लावण्य याला दुचाकीवरून रोज शाळेत घेऊन जात होत्या. आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता कविता चौधरी या मुलाला घेऊन जात असताना, ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आई व मुलगा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान ट्रक चालकाविरोधात एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संथगतीने होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामाचे बळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळेच या महिलेसह चिमुकल्याचा बळी गेला, अशा शब्दांत आपला संताप एरंडोल येथील नागरिकांनी व्यक्त केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.