अर्धापूरच्या शिक्षकाने वेतनाच्या मागणीसाठी मांडले शाळेतच बिऱ्हाड

नांदेडमधील शिक्षकाने पगार मिळत नसल्यामुळे लढवली नवी शक्कल, शाळेतच मुक्काम

0

नांदेड : राज्यात कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज बंद आहे. संक्रमणाचा धोका कमी  होताना दिसत नसल्याने अद्यापही शाळा सुरू करण्याकरिता परवानगी दिलेली नाही. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेक शिक्षकांना घरी बसण्याची वेळ आली. यामुळे शिक्षकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले.  अशात वेतनही मिळत नसल्याने आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आणि सरकारची मदत मिळवण्यासाठी शिक्षकांनी आंदोलने केले तर कोणी परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण नांदेडमधील शिक्षकाने पगार मिळत नसल्यामुळे एक नवीन शक्कल लढवली असून शाळेतच मुक्काम ठोकला आहे.

नांदेडच्या अर्धापूरमध्ये एका शिक्षकाने वेतनाच्या मागणीसाठी शाळेतच संसार थाटला. भास्कर लोखंडे, असे या शिक्षकाचे नाव असून ते गेल्या 22 वर्षांपासून खासगी शाळेत ज्ञानदानाचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, वेळोवेळी मागणी करूनही अद्यापही त्यांचे वेतन सुरू झालेल नाही. यातच कोरोनाच्या संकटात घरावर आर्थिक संकट ओढावले. बऱ्याच वेळा सरकारची मदत मागितली, पण यावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत शाळेतच मांडले बिऱ्हाड. या शिक्षकाने आपल्या मुलाबाळांसह शाळेतच बिऱ्हाड मांडले आहे. दरम्यान, या शिक्षकांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना त्यांची ही कृती चुकीची असल्याचा दावा संस्थेने केला आहे. तर आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण शाळेतच राहणार असल्याचे शिक्षकाने सांगितले आहे. खरेतर, कोरोनाच्या काळात पगार मिळत नसल्यामुळे शिक्षकांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.  काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने  वेतन मिळत नसल्याने मुंबईतील आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावर चढून  आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.  त्यामुळे अनर्थ टळला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून त्या शिक्षकाला समजवण्यात आले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.