उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड

शोभेची चांदीची बंदूक चोरीला, पॅलेसमधील कामगारानेच ही बंदूक चोरी केल्याचे उघडकीस

0

सातारा :सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून शोभेची चांदीची बंदूक चोरीला गेली होती. पॅलेसमधील कामगारानेच ही बंदूक चोरी केल्याचं आता उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी (10 नोव्हेंबर) एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यावसायिकाकडे तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळली. संशयित व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने ही बंदूक उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.