राज्यात ‘बर्ड फ्लू’च्या रूपाने नवे संकट; पाच जिल्ह्यांत फैलाव- आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री टोपे यांचे राज्यातील जनतेस काळजी घेण्याचे आवाहन

0

जालना : कोरोनास हद्दपार करण्याकरिता लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर ‘बर्ड फ्लू’च्या रूपाने नवे संकट उभे ठाकले. राज्यात पाच जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेस काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यासमोर ‘बर्ड फ्लू’च्या रूपाने नवे संकट उभे ठाकले. राज्यात पाच जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेस काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, राज्यात हायअॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असे मत मांडले. वाढदिवसानिमित्ताने जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यूदर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात हायअॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीने उपाययोजना सुरू करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले. परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जेसीबीच्या मदतीने खड्डा खणून कोंबड्या पुरण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यांतही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूने मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणे तुलनेने सोपं असले तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मांडलेले मत अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यात येत्या १६ जानेवारीपासून आधी ठरल्याप्रमाणे लसीकरणास सुरुवात होणार आहे. दररोज १० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस राज्याला मिळेल हे एक-दोन दिवसांत कळेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.