किरकोळ वादातून कारागिराने मालकाचा खून केल्याचे उघडकीस

नाशिक पोलिसांनी अवघ्या पाच तासात या खूनाचा छडा लावून एकास अटक

0

नाशिक : नाशिकमध्ये  गॅरेज मालकाच्या  डोक्यात पाना घालून मालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता . नाशिक पोलिसांनी अवघ्या पाच तासात या खूनाचा छडा लावत एकाला अटक केली. ही व्यक्ती गॅरेजमध्ये काम करणारा कारागीर होता.

मालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून या कारागिराने मालकाची खून केल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाचा पाच तासात पोलिसांनी छडा लावला. कारागिरानेच किरकोळ वादातून मालकाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. गॅरेज मालक रामचंद्र निषाद यांची डोक्यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इंदिरानगर पोलिस पथक आरोपीचा शोध घेत होते. निषाद यांच्याकडे काम करणारा कारागीर रोशन कोटकर याच्यावर पोलिसांचा संशय होता. कारण, रोशनचे मालक रामचंद्र निषाद यांच्यासोबत काही किकोळ कारणावरुन वादही झालेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. पोलिसांनी कोटकर आणि त्याचा साथीदार महेश लबडे याला येवला येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंदिरानगर पोलिस करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.