पैठण येथील व्यक्तीचा घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू
काका कणसे हे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे ते खंदे समर्थक
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने 46 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. काका कणसे (वय-46, रा. धनगाव ता.पैठण) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काका कणसे हे कार्यकर्ते होते.
घाटी रुग्णालयातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने 46 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. काका कणसे (वय-46, रा. धनगाव ता.पैठण) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काका कणसे हे कार्यकर्ते होते. माजी आमदार संजय वाघचौरे यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. घाटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कणसे हे गेले असता. तेथून ते खाली पडल्याने डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब माहिती समजताच बेगमपुरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत कणसे यांना घाटीत हलविले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. कणसे हे अपघाताने खाली पडले की त्यांनी आत्महत्या केली, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.