अ.म. पठाण लिखीत ” आईचा हात ” बालकविता संग्रहाचे प्रकाशन

मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते बालकविता संग्रहाचे प्रकाशन

0

औरंगाबाद  :  औरंगाबाद येथील गोदावरी स्कूलमध्ये मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते अय्युब पठाण लोहगावकर ऊर्फ अ.म. पठाण लिखीत, ” आईचा हात ” या बालकविता संग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद येथील गोदावरी स्कूलमध्ये मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद येथील गोदावरी स्कूलमध्ये मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते अय्युब पठाण लोहगावकर ऊर्फ अ.म. पठाण लिखीत, ” आईचा हात ” या बालकविता संग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद येथील गोदावरी स्कूलमध्ये मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे  म्हणाले की, ” आईचा हात,” हा बालकविता संग्रह बालमनावर संस्कारांची पेरणी करणारा असून त्यात गाव शिवाराची सार्थ ओळख करून देणारा आहे. हल्लीच्या काळात असे दर्जेदार व कसदार लेखन असणारे बालकविता संग्रह फार दुर्मिळ झाले आहे, असे  मनोगत मांडले .” यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ प्रदीप विखे, तसेच जिल्हाध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तथा कवी मनोज खुटे
हे होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी  शिवाजी बनकर ,प्रा. बंडू सोमवंशी, शेख जाहेदभाई, नवाब-महंमद टाकळीकर, रंगनाथ आसाराम हिवाळे, (स्वातंत्र्य सैनिक) शेख इलियास, जफरखान पठाण, मुद्दस्सर पठाण, रमाकांत छडीदार, नितीन कवडे यांची प्रमुख उपास्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिक्षक मनोज खुटे यांनी मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.