वडोद खुर्द येथे मुसळधार पावसाने घर अचानक कोसळले, एक जण जखमी

कुटुंबातील सदस्यांचा बचाव करताना अंगावर घराचे छत पडून गंभीर जखमी

0

सुलतानपूर  : खुलताबाद तालुक्यातील वडोद खुर्द येथे  दमदार पावसाने बापूसाहेब रामकृष्ण लगड यांचे राहते घर अचानक कोसळले या घटनेमध्ये त्यांच्या पत्नी यशोदा बापूसाहेब लगड गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले

वडोद खुर्द येथे  दमदार पावसाने बापूसाहेब रामकृष्ण लगड यांचे राहते घर अचानक कोसळले या घटनेत त्यांच्या पत्नी यशोदा बापूसाहेब लगड गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान घटना घडली तेव्हा घरामध्ये बापूसाहेब कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी यशोदा दोन मुले ओमकार व प्रसाद आणि त्यांच्या आई चंद्रकला या घरात होत्या यशोदा या कुटुंबातील सदस्यांचा बचाव करत असताना त्यांच्या अंगावर घराचे छत पडून त्या गंभीर जखमी झाल्या तर ओमकार व प्रसाद आणि चंद्रकला बाई या कशाबशा या अडचणीतून बाहेर पडल्या परंतु या घटनेचा जबर धक्का बसून दोन्ही बालके प्रचंड घाबरलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य कपडे या साहित्य साहित्य सर्वकाही घराखाली दबले गेले आहे. दरम्यान घटनेचा पंचनामा तलाठी श्रीमती विटेकर व पोलिस पाटील लगड यांनी केला असुन अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान दाखवण्यात आले आहे.  पंचनामा चा अहवाल अहवाल तहसील प्रशासनाला दाखल करण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.