विधानसभा अधिवेशनादरम्यान रोहा-तांबडी भव्य मराठा मोर्चा निघणार

रोहा तालुक्यातील बलात्कार आणि हत्याप्रकरणी मराठा मोर्चा समन्वयकांची आक्रमक भूमिका

0

रायगड : जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी मराठा मोर्चा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज (17 ऑगस्ट) दुसऱ्यांदा पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच पीडितेला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा अधिवेशनादरम्यान रोहा-तांबडी, असा भव्य मराठा मोर्चा काढणार असल्याचाही इशारा सरकारला दिला.
यावेळी त्यांनी सकल मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चाही केली. मराठा मोर्चा समन्वयकांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे म्हणाले, “या जिल्ह्याचे खासदार आणि या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. पालकमंत्री या महिला असतानाही या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये शंका निर्माण होते आहे.” मराठा मोर्चाने भूमिका घेतल्याने रोहा तालुक्यात घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेविरोधात वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे. मराठा मोर्चा समन्वयकांची या भेटीत स्थानिक पचंक्रोशीच्या ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. स्थानिक पातळीवरच विधानसभा अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्याची तारीख निश्चित करण्याचे ठरले. मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा दोन्ही संघटना रोहा-ताबंडी प्रकणात पहिल्यांदाच सोबत असणार आहे, अशी माहिती समन्वयकांनी दिली. दरम्यान, पीडितेला आदरांजली देण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावर सकल मराठा समाजातर्फे पीडित मुलीला आदरांजली वाहण्यासाठी बॅनर लावण्यात आले. तसेच या बॅनरला हात लावण्याची हिंमत कोणीही करू नये, असा इशारा समन्वयक राजन घाग यांनी दिला. याआधी मराठा मोर्चा समन्वयकांनी गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची भेट घेऊन पीडितेच्या कुटुंबियांना खटला संपेपर्यंत सरंक्षण देण्याची मागणी देखील केली होती. रोहा अत्याचार प्रकरणाचा तपास डीवायएसपी किरण कुमार सूर्यवंशी यांच्याकडून काढून घेतल्याने मराठा समन्वयकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. याविषयी त्यांनी रोहा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शेख यांच्याकडे देण्यात आल्याचा खुलास करण्यात आला. यावेळी राजन घाग, महेश डोंगरे, महेश राणे, युवराज सुर्यवंशी, रमेश खोरे पाटील, राजू भुळे, विवेक सावंत, रुपाली निंबाळकर, छाया इंदुलकर, श्यामा पवार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.