पिंपरीत पोलिस ठाण्याच्या आवारातच वाहनांना अचानक आग

काही वेळानंतर स्फोट होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातवरण

0

पिंपरी : पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीत 7 ते 8 वाहने जळून खाक झाली आहेत. तर, काही वेळानंतर स्फोट होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले होते.

पिंपरी पोलिस ठाणे हे अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर आहे. बाजूलाच चिंचवड स्टेशन चौक असून काही अंतरावर पेट्रोल पंप देखील आहे. या आगीमुळे अन्य नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सुमारे 50 चारचाकी वाहने लावलेली आहेत. तर, सुमारे 100 हून अधिक दुचाकी वाहने आहेत. ही सर्व वाहने बेवारस, विविध गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्यात आलेली असल्याने जप्त केलेली आहेत. मोटारी आणि दुचाक्या असल्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने स्फोट होत आहेत. आगीने रौद्ररुप धारण केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे 3 बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली की समजकंटकांकडून हा प्रकार करण्यात आला, याचा तपास पोलिस करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.