ऐन सणासुदीच्या तोंडावर ‘सुदर्शन केमिकल’ कंपनीत भीषण अग्नितांडव

आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त

0

रोहा : ऐन सणासुदीच्या दिवसाआधी केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात असलेल्या धाटाव एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी. सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात असलेल्या धाटाव एमआयडीसीमधील ‘सुदर्शन केमिकल लिमिटेड’ या कंपनीच्या डी. सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ही आग काही क्षणात एवढी भयंकर भडकली की त्याचे उंच लोळ दूरपर्यंत पसरलेले दिसत होते. यात अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची  माहिती नाही.  ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात स्थानिकांनी कैद केली. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मध्यरात्री लागलेल्या या आगीत पाहता पाहता कंपनीचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आगीचे लोळ लांबपर्यंत उडत होते. तर परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा रौद्ररुप धारण करून होता. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीची भीषणता इतकी भीषण होती की, रात्रीत संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासन आणि रोहा नगरपालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्यावर सुमारे तासाभरात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.