पंकजा मुंडेंचा थेट इशारा; सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?

धमक्या देऊन आणि भाड्याची लोकं आणून हा संप होत नव्हता. हे असे चालणार नाही !

0

बीड : ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून  राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील कुठल्याही मुकादमाने आणि ऊसतोड कामगारांनी आपले बिऱ्हाड बांधू नये, ऊसतोड कामगारांनी उग्रस्वरूप धारण केल्यास ते कोणत्या टोकाला पोहोचतील हे सांगता येणार नाही, असे भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले होते. त्यावर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीच प्रतिक्रिया दिली.

ते काय ऊसतोड कामगारांना धमकी देत आहेत काय?, हा संप आतापर्यंत लोकांच्या स्वयंस्फूर्तीनं होत होता. धमक्या देऊन आणि भाड्याची लोक आणून हा संप होत नव्हता. हे असे चालणार नाही, असा इशाराच पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना दिला आहे. तत्पूर्वी ऊसतोड कामगार संघटना, महाराष्ट्र कामगार श्रमिक संघटना आणि मी भारतीय पार्टीचा आमदार आणि सर्व 11 संघटना या सर्वांच्या सहमतीने ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ करण्यात यावी. मुकादमांचे कमिशन 18.50 टक्क्यांवरून 37 टक्के करण्यात यावे. वाहतूकदारांची दरवाढ करून त्यांना 50 टक्के वाढ देण्यात यावी. साखर कारखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातील व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून द्यावे, अशा मागण्या आम्ही केल्याचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितले होते. मांजरीला साखर संघासोबत सर्वांची बैठक बोलावली आहे, ती बैठक होईपर्यंत राज्यातील कुठल्याही मुकादमाने आणि ऊसतोड कामगारांनी आपलं बिऱ्हाड बांधू नये, ऊसतोड कामगारांनी उग्र स्वरूप धारण केल्यास ते कोणत्या टोकाला पोहोचतील हे सांगता येणार नाही. ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचंही सुरेश धस म्हणाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.