हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील लिपिकास 11 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

लिपीक विनायक देशपांडेला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0

हिंगोली  : येथील शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वैद्यकीय देयक तयार करून सदर देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णालयातील लिपीक विनायक देशपांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता रुग्णालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे एकूण १ लाख ४२६६० रुपयांचे दोन वैद्यकीय देयक मंजूर झाले होते. सदर देयक तयार करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी कार्यालयातील लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजार रुपयांची लाच मागितली. सदर रक्कम आज शासकीय रुग्णालयात आणून देण्याचे ठरले होते. दरम्यान, या प्रकरणात संबंधित रुग्णसेवकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडताळणी झाल्यानंतर आज  लाचलुचपतचे प्रभारी उपाधिक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफtने, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, अवी किर्तनकार, ज्ञानेश्‍वर पंचेलिंगे, प्रमोद थोरात, सरनाईक यांच्या पथकाने आज( ता.25) बुधवारी दुपारी एक वाजता रुग्णालय परिसरात सापळा रचला  दरम्यान, आज दुपारी तक्रारदार शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर गेल्यानंतर लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजाराची लाच घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.