भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अर्णव गोस्वामी यांच्या अ्टकेच्या निषेधार्थ परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई

0

औरंगाबाद : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अ्टकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस परवारनगी न घेता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात आंदोलन केल्याप्रकरणी पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्यासह 12 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, पूर्वचे आमदार अततुल सावे, समीर राजूरकर, अनिल मकरिये, कुणाल मराठे, मनोज पांगरकर, राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, बंटी राजू चावरिया, महेश राऊत, विजय लोखंडे, प्रमोद राठोड यांच्यासह महिला पदाधिकऱ्यांसह 80 ते 90 कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता, मनाई आादेश लागू असतानाही बुधवारी (ता.चार) सकाळी साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान पोलिस विभागाची कोणतीही परवानगी न घेता निषेध आंदोलन केले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार कचरू निकम यांनी तक्रार दिली. या प्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.