भरधाव ट्रकची चार बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू

आज पहाटे बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊसतोडणीसाठी होत्या निघाल्या

0

इंदापूर : पोटासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन धडपडणार्‍या ऊसतोड मजुरांवर काळाने घाला घातला आहे.  बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर भरधाव ट्रकने 4 बैलगाड्यांना जोरात धडक दिल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर भरधाव ट्रकने 4 बैलगाड्यांना जोरात धडक दिल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या  बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे  निघाल्या होत्या.  बेलवाडी जवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रक चालकाने चार बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये एका ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. तर एक बैलही मृत्युमुखी पडला आहे. तर चार बैल जखमी झाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.