‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha – PPC) २०२६ या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संवाद साधण्यास उत्सुक असलेले शालेय विद्यार्थी innovateindia1.mygov.in या अधिकृत वेबसाइटवर पीपीसी २०२६ साठी रजिस्ट्रेशन (नोंदणी) करू शकतात.
हा कार्यक्रम सुरू करण्यामागील मुख्य उद्देश हा आहे की बोर्ड परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या मनातील तणाव, भीती आणि चिंता दूर व्हावी.
सहभागी कोण होऊ शकतात? यावर्षी, इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. हा कार्यक्रम केवळ संवादाचे माध्यम नाही, तर एक राष्ट्रीय मंच आहे, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक थेट पंतप्रधानांशी जोडले जातात आणि परीक्षांशी संबंधित आव्हाने व त्यांच्या उपायांवर खुलेपणाने चर्चा करतात.
यावर्षी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक देखील विशेष स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात, ज्यात त्यांना विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे अनुभव सांगावे लागतील.
नोंदणी कधीपर्यंत आणि निवड कशी होईल? ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी ११ जानेवारी २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाइट innovateindia1.mygov.in वर अर्ज (apply) करता येईल. हा कार्यक्रम जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप तारीख घोषित करण्यात आलेली नाही.
पीपीसी २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड काही क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धांद्वारे (रचनात्मक लेखन स्पर्धा) केली जाईल. विद्यार्थ्यांची निवड MyGov प्लॅटफॉर्मवर दिलेल्या रचनात्मक लेखन किंवा कृती-आधारित (activity-based) स्पर्धेतील त्यांच्या एंट्रीच्या गुणवत्तेवर आधारित असेल.
यावर्षीच्या रचनात्मक (creative) विषयांमध्ये ‘परीक्षांना उत्सव बनवा’, ‘आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’, ‘पर्यावरण वाचवा’ आणि ‘स्वच्छ भारत’ यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काय मिळेल? परीक्षेसंबंधीच्या या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निवड झाल्यानंतर त्यांना आकर्षक बक्षिसे आणि विशेष लाभ मिळतील:
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.
2. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खास डिझाइन केलेली परीक्षा पे चर्चा किट (kit) प्रदान केली जाईल.
3. त्यांना पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र (signed certificate) दिले जाईल.
4. पंतप्रधानांकडून त्यांना थेट असे ‘परीक्षा मंत्र’ मिळतील, जे त्यांना तणावमुक्त (stress free) राहून उच्च गुण मिळवण्यास मदत करतील.
पीपीसी २०२६ साठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी? इच्छुक विद्यार्थी खालील पायऱ्या (steps) वापरून ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात:
1. MyGov च्या अधिकृत वेबसाइट innovateindia1.mygov.in/ppc-2026 ला भेट द्या.
2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर (homepage) ‘Participate Now’ वर क्लिक करा.
3. आता तुमची श्रेणी (category) निवडा – विद्यार्थी, शिक्षक किंवा पालक.
4. मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून MyGov पोर्टलवर लॉगिन/नोंदणी (register) करा.
5. तुमच्या श्रेणीशी संबंधित ऑनलाइन MCQ क्विझमध्ये सहभागी व्हा.
6. सर्व तपशील भरल्यानंतर पीपीसी २०२६ चा अर्ज (फॉर्म) सबमिट करा.
7. विद्यार्थी इच्छित असल्यास, पंतप्रधानांना विचारण्यासाठी आपला प्रश्न देखील पाठवू शकतात
