Janhavi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही सध्या जोरदार चर्चेत आहे. तिच्या मिस्टर अँड मिसेस माही सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या तिच्या चित्रपटाचे ती जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.
जान्हवी कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते हैरान झाले आहेत. जान्हवी कपूरकडे (Janhavi Kapoor) भरस्टेडियममध्ये मोबाईल फेकले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
जान्हवी कपूरचा (Janhavi Kapoor) व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स याच्यातील सामन्यामधील आहे. यावेळी जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही ओरी याच्यासोबत स्टेडियममध्ये पोहोचली होती. तेव्हा अनेकांनी जान्हवी कपूरचे फोटो काढले होते. त्यातील काही क्रिकेट रसिकांनी आपले काही मोबाईल जान्हवीकडे भिरकवले होते. तेव्हा त्यातील एक मोबाईल जान्हवीकडे आला.
मोबाईल जान्हवीकडे भिरकवले
एक एक करून तब्बल 5 ते 6 मोबाईल इतर लोकांनी जान्हवीकडे फेकले होते. जान्हवी कपूरने चाहत्यांनी फेकलेले मोबाईल देखील पकडले होते. त्यातील एक मोबाईल हा जान्हवीला लागल्याचं त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी जान्हवी कपूर हसताना दिसली आहे.
जान्हवी कपूरकडे लोकांनी मोबाईल फेकले होते ते व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ते पाहून आता लोकच हैराण झाली आहेत. यावेळी ओरी आणि जान्हवी कपूर दिसले होते. ते दोघेही चांगले मित्र आहेत. त्यावेळी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.