राजकारणात खळबळ: ‘निवडणुका नको, थेट महापौर-नगरसेवक पदांचा लिलाव करा!’ शिंदे गटाच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे उपरोधिक मागणी

ainnews
2 Min Read

नागपूर येथे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा बिगुल वाजत असतानाच,, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका नेत्याने मोठी आणि अजब मागणी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि वाळवा तालुका संघटक असणारे वीर कुदळे (Veer Kudale) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही अनोखी मागणी केली आहे.

निवडणुका रद्द करून पदांचा जाहीर लिलाव करा वीर कुदळे यांनी अशी मागणी केली आहे की, राज्यात यापुढे महानगरपालिका (महापालिका) आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. या निवडणुका रद्द करण्याऐवजी, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक या महत्त्वाच्या पदांचा जाहीर लिलाव (Public Auction) करण्यात यावा,. कुदळे यांनी आष्टा नगरपरिषदेची निवडणूक शिंदे गटाकडून लढवली होती.

मागणीमागील उपरोधिक टोला कुदळे यांची ही मागणी म्हणजे सद्यस्थितीतील राजकारणावर केलेला एक उपरोधिक टोला आहे,. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणांनी अनेकांना धक्का दिला होता; यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाल्याचे दिसून आले. या राजकीय बदलांमुळे आणि निवडणुकीत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची ओरड सुरू असतानाच, कुदळे यांच्या मागणीने चर्चेला उधाण आले आहे.

मतदारांना पैसे वाटप आणि गुन्हेगारांना संधी वीर कुदळे यांनी ही मागणी करण्यामागे निवडणुकीत झालेल्या पैसे वाटपाचे कारण दिले आहे. सर्वच पक्षांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले होते, यावर टीका करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

या मागणीला उपरोधाची आणखी किनार जोडत कुदळे यांनी सुचवले की, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक विधेयक सादर करून ते मंजूर करावे. तसेच, या पदांसाठी वंचित असणाऱ्या गुंड आणि गुन्हेगारांनाही संधी द्यावी, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.

कुदळे यांनी आपले हे मागणी करणारे निवेदन केवळ मुख्यमंत्र्यांनाच नव्हे, तर निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींनाही पाठवले आहे. त्यांच्या या मागणीमुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *