80 हजार कोंबड्यांना मृत्यूदंंडाची शिक्षा, मुरुंबा कुपटा गाव ‘बर्ड फ्ल्यू संसर्गित घोषित

एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या, पाळीव पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

0

मुंबई : सात राज्यांनंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला. परभणीत मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला.  सेलू तालुक्यातील कुपटा गावात 500 कोंबड्यांचा मृत्यू झाला. भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने ही माहिती दिली.

मुरुंबा आणि कुपटा गाव बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित केले. गावात एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या, पाळीव पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. १० किलोमीटर अंतरापर्यंत कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे.  तसेच गावातील लोकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे.  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील बर्ड फ्लूच्या संसर्गाबाबत माहिती दिली. २००६ पेक्षा आत्ताचा बर्ड फ्लू वेगळा आहे त्यामुळे कोणत्याही पोल्ट्रीचालकांनी माहिती लपवू नये, असे आवाहन पशू संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. एकटया परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ७० ते ८० डिग्री सेल्सिअसवर चिकन अर्धातास शिजवून खाण्यास हरकत नाही, असे सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे आणि नागपुरात भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार कऱण्यात आली. तिथे सँपल टेस्टींगची परवानगी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट संपत नाही. त्यात आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.