80 वर्षांच्या शरद पवारांची मोदी सरकारला भीती : धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट

0

पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देशातील मोदी सरकारमधील नेत्यांना 25 वर्षांच्या एखाद्या नेत्याची भीती असते, अगदी तशीच भीती 80 वर्षांच्या शरद पवार यांची आहे, असे वक्तव्य केले. “होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे आपण ऐकतो, ते शरद पवार साहेबांनी सत्यात उतरवून दाखवले,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खाल्लेलेल्या अन्नाला तरी जागा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. शेतकरी जगला तर आपण जगू म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, आणि शेती करत नसला तरीही पाठिंबा द्यावा , असे आवाहन धनजंय मुंडे यांनी केले. शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सत्ता देणाऱ्या जनतेचे म्हणणे ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल त्यांना श्रवणाखाली द्यायला हवी? कारण, त्याची मशीन अद्याप निर्माण झालेली नाही, अशा वेळी हाताचा वापर करावा लागतो, असा टोला मुंडे यांनी लगावला.

मला दिव्यांगांचे खाते का दिले. याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. माझा लहान भाऊ कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. याची कल्पना शरद पवार यांना आहे आणि म्हणूनच त्यांनी मला हे खाते दिले. मी या दिव्यांगांना तळमळीने न्याय देईन, हा त्यांना विश्वास आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगले काम करणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यापुढे आधी श्रवणयंत्रांचे वाटप करू आणि मग आपण आपली मनोगते करू, तेंव्हाच यांना ऐकू येते हे आपल्याला कळेल, असे धनंजय मुंडे म्हणाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि जगदंब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.