6 वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला – डेझी ईराणी

0

जेष्ठ अभिनेत्री डेझी ईराणी यांनी स्वत: बाबत एक मोठा खुलासा केला आहे. प्रसिद्धीच्या मार्गावर असताना त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.

डेझी यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या फरहान अख्तर आणि जोया अख्तर यांच्या मावशी आहेत. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावरील झालेल्या अत्याचाराबाबत मौन सोडले आहे. त्या 6 वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता.

त्या म्हणाल्या, ‘त्या व्यक्तीचे नाव नझीर होते. तो आता हयात नाहीये. त्याची आणि प्रसिध्द गायिका जोहराबाई अंबालेवाली यांच्याशी ओळख होती. त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्येदेखील चांगली ओळख होती. माझ्या आईला मला मोठी अभिनेत्री बनवायचे होते. मी ‘बेबी’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले होते. ‘हम पंछी एक डाल के’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी नझीर अंकलसोबत मद्रासला गेले होते.

मला त्या भयानक घटनेची थोडी-थोडी आठवते. परंतु त्याने मला बेल्टने मारलेले आजही चांगले आठवते. त्या वेदना आजही मला त्रासदायक वाटतात. मी कधीच याविषयी कुणाला काही सांगू शकले नाही, माझी हिंमतच झाली नाही.’

डेझी यांनी नया दौर, जागते रहो, बुट पॉलिश, धूल का फूल अशा अनेक चित्रपटांत काम केले आहेत. त्यांनी राज कपूर, किशोर कुमार, दिलीप कुमार, देव आनंद या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.