अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू, शाळा-कॉलेज सर्व बंद, कारण…

अहमदाबाद स्थानिक प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू लागूचा निर्णय

0

अहमदाबाद : गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर सुरुच आहे. राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या अहमदाबादमध्ये दिवाळीनंतर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अहमदाबाद येथील स्थानिक प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला.
अहमदाबादमध्ये दिवाळीनंतर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अहमदाबाद येथील स्थानिक प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. हा कर्फ्यू 20 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता सुरू होईल आणि 23 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता संपेल अहमदाबादमध्ये 57 तासांच्या कर्फ्यूदरम्यान केवळ दूध आणि औषधे यांचीच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. गुजरात सरकारचा 3 नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णयदेखील पुढे ढकलण्यात आला. 57 तासांच्या कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर अहमदाबादमधील कालुपूर मार्केटमध्ये आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. नागरिक कोणत्याही खबरदारीशिवाय खरेदी करताना दिसले. अहमदाबादमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,845 पर्यंत पोहोचली आहे. यात सर्वात जास्त रुग्ण शहराच्या पश्चिम भागात आहेत. एकट्या उत्तर पश्चिम भागात सर्वात जास्त 477 सक्रिय रुग्ण आहेत. यानंतर दक्षिण पश्चिम भागात 452, आणि पश्चिम भागात 446 आणि मध्य भागात सर्वात कमी 274 रुग्ण आढळले. गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्रसिंह चुडास्मा म्हणाले, गुजरात सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.