राहुल-प्रियांकासह 153 जणांविरोधात 48 पानी एफआयआर, लवकरच कारवाई

काँग्रेस नेते राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जाताना अटक

0

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय मुलगी सामूहिक बलात्काराची बळी  ठरली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र यूपी पोलिसांनी त्यांना अडवत धक्काबुक्की करून अटक केली.

हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय मुलगी सामूहिक बलात्काराची बळी  ठरली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र यूपी पोलिसांनी त्यांना अडवत धक्काबुक्की करून अटक केली.राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना अटक करत गौतम बुद्धनगरच्या पोलिसांनी 153 जणांविरोधात 48 पानी एफआयआर दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावर लवकरच कायदेशीर कारवाई करणार  आहे. दरम्यान, गौतम बुद्ध नगर पोलिसांनी एफआयआरमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, अजय कुमार लल्लू, दीपेन्द्रसिंग हुड्डा, पीएल पुनिया, सचिन पायलट, गौतम बुध नगर काँग्रेसचे अध्यक्ष अजय चौधरी, नोएडा महानगर काँंग्रेसचे अध्यक्ष शहाबुद्दीन आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्रसिंग गुड्डू यांच्यासह 153 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नावांचा समावेश आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.