धुळे-सुरत महामार्गावर धावती ‘लक्झरी बस’ पेटल्याने चालकाचे प्रसंगावधान, वाचले 40 प्रवासी

बसमधील प्रवाशांचे सामान जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

0

नवापूर : औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सोमवारी पहाटे  ३:३० वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

 औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सोमवारी पहाटे  ३:३० वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला. औरंगाबादहून अहमदाबादकडे एमके ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम एच ४० ए टी २९२९) ही  जात होती. बस पहाटे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट उतरून सोनखांब शिवारातून जात असता, लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने तात्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवून बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. सुदैवाने जीवितहानी टळली मात्र आगीचे स्वरुप अतिशय तीव्र असल्याने काही क्षणात बसने पेट घेतला. या दरम्यान काही प्रवाशांचे साहित्य गाडीत अडकल्यामुळे जळून खाक झाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.